Tuesday, 12 January 2016

परिपाठ

परिपाठ
🌀🌀🌀
वार :*- बुधवार
दि -: १३/१/२०१६
🌀🌀🌀🌀🌀
संकलन
बालचंद चौधरी
वैजापुर
९५४५२३८१०२
🌀🌀🌀🌀🙏🏽

आजचे पंचाग
🌀🌀🌀🌀
भूगोल दिन किंवा मकरसंक्रांत
गुरूवार
तिथी : पौष   -   पंचमी १९३७
पक्ष : शुक्ल
मकर सकरांति
सूर्योदय: ०७::१५ ↑ (११२°) सूर्यास्त: १८::२१ ↑ (२४८°)
🌀🌀🌀🌀🌀

आजचे सुभाषित
🌀🌀🌀🌀🌀
उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |
दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||
🌀🌀🌀🌀🌀

आजचे दिनविशेष
🌀🌺🍀❇
 १९५७ : हिराकूड धरणाचे उदघाटन झाले.
    जुन्या काळातील ‘बालिका-जरठ’ विवाहप्रश्नावर आधारित ‘शारदा’ या गोविंद बल्लाळ देवलांच्या अतिशय गाजलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला.
    १६१० : गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
    १९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
    २००२ : घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
    विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ विल्यम वेन.
    १९३८ : भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा.
    १९४८ : गज सिंघ, जोधपूरचा राजा.
🌻❇🍀🌹🌺

आजचि सुविचार
🌀🌀🌀🌀
किसी की निंदा ना करें| अगर आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते हैं, तो ज़रुर बढाएं| अगर नहीं बढ़ा सकते, तो अपने हाथ जोड़िये, अपने भाइयों को आशीर्वाद दीजिये, और उन्हें उनके मार्ग पे जाने दीजिये| स्वामी विवेकानन्द
🌀🌀🌀🌀🌀🌀

आजचि म्हण
🌀🌀🌀🌀
कानात बुगडी,गावात फुगडी.
🌀🌀🌀🌀🌀🌀

आजचि बोधकथा
🌀🌀🌀🌀🌀
एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''
बोध
🌺❇🍀
आपलि आई हि देवाने
दिलेलि खुप मोटी देंनगि आहे
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

आजचि प्रार्थना
🌀❇🍀🌀
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
🌀🍀❇🌺
आजचे समुहगित
🌀🌀🌀🌀🌀
भारत देश महान अमुचा भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कॄष्ण हनुमान॥धृ॥

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥
🌀🌀🌀🌀🌀🌀
आजचे थोरव्यक्ति
🌀🍀❇🌺🌹
श्रीनिवास रामानुजन
श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
🌀🌀🌀🌀🌀🌀
आजचे बालगित
🌀🌀🌀🌀
ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?

झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?

गार गार वार्‍यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?

धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आतां हसतोस का ?
🌀🌀🌀🌀🌀🌀

भावनिक  विचार
🌀🌀🌀🌀🌀
घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
🌀🌀🌀🌀🌀
अनमोल वचन
➖🙏🏽🌀❇➖
प्रेमी, पागल, और कवी एक ही चीज से बने होते हैं !
भगत सिंह:

➖➖➖🌀➖➖

आजचे बडबडगित
🌀➖🌀🌀➖🌀
चाळणी म्हणे गाळणीला

मी तर तुझी मोठी बहीण

गाळणी म्हणे चाळणीला

आणि मी लहान बहीण

चाळणी म्हणे चाळू का पीठ

गाळणी म्हणे चाल कि नीट

गाळणी म्हणे गाळू का चहा

चालणी म्हणे सांडतोय पहा

भांडता भांडता भांडण विसरले

आईने त्यांना कपाटात ठेवले

🌀🌀🌀🌀🌀➖

पेरणादायि विचार
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर
जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर
पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच
आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात.
🌀🌀🌀🌹🌺❇